Mi Maharashtracha Lyrics – Suresh Wadkar

Mi Maharashtracha Lyrics (मी महाराष्ट्राचा) – Suresh Wadkar, Vaishali Samant Is Latest Marathi Song And Music Composed By Abhijeet Rane Write Lyrics By Rajesh Bamugade.

Song Title: Mi Maharashtracha
Singer: Suresh Wadkar, Vaishali Samant
Music / Composer: Abhijeet Rane
Lyrics: Rajesh Bamugade
Music Label: Times Music Marathi

Mi Maharashtracha Lyrics – Suresh Wadkar

धन्य झाहलो इथे जन्मलो गर्व असे हो याचा
किर्ती गावुनी गौरवशाली जयजयकार हा गर्जा
धन्य झाहलो इथे जन्मलो गर्व असे हो याचा
किर्ती गावुनी गौरवशाली जयजयकार हा गर्जा
माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा
माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा

थोर ही महती उज्वल किर्ती सांगती सह्याद्री चे कडे
बोली बदले प्रांत बदलता दर्शन हे संस्कॢतीचे घडे
परंपरेला जोपासूया नाळ जी संस्कारांशी जूडे
वैभवी नेवू माय मराठी पाऊल पडते असे पुढे

पवित्र देशी मंगल भूमी या
गड-किल्ल्यांचा सहवास
शौर्य स्मृतींना जतन करूया अपुला हा इतिहास
संत अभंग पंत कवीत्व तंत कवण रसदार
शक्तीयुक्तीचा मराठीबाणा रणात रणात रण झुंजार

जरी पटक्याचा भगवा झेंडा वैभवात फडकला
गुढी उभारली कर्तुत्वाची अटकेपार धडकला
माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा
माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा

महाराष्ट्र धर्म जाणूनी मर्म यशो गुणाला साजा
जगात गाजे नाव जयाचे शिवकल्याण राजा
नव्या पिढीला देऊ चला वारसा जय महाराष्ट्र
स्वर्गाहुन या सुंदर करूया नवमहाराष्ट्र उद्याचा

धन्य जाहलो इथे जन्मला गर्व असे हो याचा
कीर्ती गाऊनी गौरवशाली जय जय कार हा गर्जा
धन्य जाहलो इथे जन्मला गर्व असे हो याचा
कीर्ती गाऊनी गौरवशाली जय जय कार हा गर्जा
माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा
माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा
माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा
माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा

Leave a Comment